'नद्यांचं पाणी रोखल्याने आम्हांला फरक पडत नाही'; पाकिस्तानचं स्पष्टीकरण
22 February 14:15

'नद्यांचं पाणी रोखल्याने आम्हांला फरक पडत नाही'; पाकिस्तानचं स्पष्टीकरण


'नद्यांचं पाणी रोखल्याने आम्हांला फरक पडत नाही'; पाकिस्तानचं स्पष्टीकरण

कृषिकिंग, लाहोर: भारतातून पाकिस्तानमध्ये जाणाऱ्या रावी, सतलज आणि बियास या तिन्ही नद्यांचं पाणी अडवण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे. यासंबंधीचे इशारा काल (गुरुवारी) केंद्रीय जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी दिला होता. त्यांच्या या इशाराला उत्तर देत पाकिस्तानने भारताच्या या निर्णयाचा आम्हाला काहीही फरक पडत नसल्याचं स्पष्ट केलं आहे. 'द डॉन'ने याविषयीचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

पाकिस्तानी जलसंपदा मंत्रालयाचे सचिव ख्वाजा शुमैल यांनी याविषयी वक्तव्य करत त्यांच्या राष्ट्राची भूमिका मांडली. ''भारताने नद्यांचं पाणी वळवून त्याचा वापर त्यांच्या जनतेसाठी करण्याच्या निर्णयाची आम्हाला मुळीच धास्ती नाही. मुळात या निर्णयामुळे आम्हाला काहीच फरक पडत नाही. कारण, 'आडब्ल्यू ट्रिटी', सिंधू नदीच्या पाणी करारातही त्यासाठीची परवानगी आहे." असं ते म्हणाले आहे.

पूर्वीय नद्यांचं पाणी अडवल्यास काहीच अडचण नसल्याचं पाकिस्तानकडून सांगण्यात आलं असलं तरीही पश्चिम भागातील नद्यांचं म्हणजेच चिनाब, सिंधू आणि झेलम या नद्यांचं पाणी अडवण्यात आलं तर मात्र याला पाकिस्तानची हरकत असेल, असंही त्यांच्याकडून सांगण्यात आलं आहे.

भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश वेगळे झाल्यानंतर भारताला ३ आणि पाकिस्तानलाही ३ नद्यांचं पाणी देण्याचा निर्णय झाला होता, असं म्हणत आपल्या वाट्याच्या नद्यांचंही पाणी पाकिस्तानला मिळत होतं. ही बाब गडकरींनी भाषणादरम्यान स्पष्ट केली. आणि पाकिस्तानात वाहून जाणारं पाणी थांबवण्याबाबत काल सांगितले होते.संबंधित बातम्या