मध्यप्रदेशातील अनेक भागांमध्ये जोरदार पावसासह गारपिट; ७ लोकांचा मृत्यू
21 February 17:19

मध्यप्रदेशातील अनेक भागांमध्ये जोरदार पावसासह गारपिट; ७ लोकांचा मृत्यू


मध्यप्रदेशातील अनेक भागांमध्ये जोरदार पावसासह गारपिट; ७ लोकांचा मृत्यू

कृषिकिंग, भोपाळ: वातावरणात झालेल्या बदलामुळे मध्यप्रदेशातील अनेक भागांमध्ये गारपिट झाली आहे. राजधानी भोपाळसह रायसेन, विदिशा आणि आसपासच्या परिसरात आज (गुरुवारी) मध्यरात्री १.३० ते ३.४५ च्या सुमारास मोठ्या प्रमाणात गारपीट झाली आहे. विदिशा जिल्ह्यातील ग्यारसपुर परिसरातील घुरेरा गावात गारपिटीमुळे ७ लोकांचा मृत्यू झाला आहे.

गारपिटीमुळे रायसेन, सुल्तानगंज परिसरात रब्बीच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याशिवाय विदिशा आणि अन्य जिल्ह्यांमध्येही पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे वृत्त आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, येत्या २४ तासांमध्ये मध्यप्रदेशातील बैतूल, हरदा, खंडवा, देवास, सतना, छिंदवाड़ा, सागर, जबलपुर, राजगढ़, उमरिया, मंदसौर आणि नीमच या १२ जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. राजस्थानपासून विदर्भापर्यंत एक कमी दाबाचा पट्टा कार्यरत आहे. त्यामुळे या भागात अनेक ठिकाणी जोरदार पावसासह गारपीट होण्याची शक्यता आहे. असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.संबंधित बातम्या