भारत पाकिस्तानचं पाणी बंद करणार; वाचा काय आहे बातमी
21 February 14:57

भारत पाकिस्तानचं पाणी बंद करणार; वाचा काय आहे बातमी


भारत पाकिस्तानचं पाणी बंद करणार; वाचा काय आहे बातमी

कृषिकिंग, बागपत(उत्तरप्रदेश): पुलवामा हल्ल्यानंतर दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानला सर्वच स्तरातून घेरण्याचा प्रयत्न केला जातोय. आता पाकिस्तानात जाणारं पाणी बंद करण्याची तयारी केंद्र सरकारने सुरु केली आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक, परिवहन तथा जलसंसाधन मंत्री नितीन गडकरी यांनी उत्तरप्रदेशातील बागपत येथे बोलताना सांगितले आहे की, "भारतातून वाहणाऱ्या तीन नद्यांचे पाणी पाकिस्तानला जाते. या ३ नद्यांच्या पाण्यापैकी एका नदीचे पाणी लवकरच बंद केलं जाणार आहे. या नदीचे पाणी यमुना नदीत सोडले जाणार आहे. हे पाणी यमुना नदीत सोडल्याने उत्तर भारतीय राज्यांना या पाण्याचा मोठा फायदा होईल. तसेच शत्रू राष्ट्र पाकिस्तानला यातून मोठा धडा मिळणार आहे."

याशिवाय या तीनही नद्यांचे पाणी यमुना नदीला जोडून पाकिस्तानला ओसाड बनविण्याची धमकीही त्यांनी यावेळी दिली आहे. या तिन्ही नद्यांना जोडण्याच्या प्रकल्पावर काम सुरु आहे. याद्वारे जलवाहतुकही सुरु केली जाईल, असेही गडकरी यांनी सांगितले आहे.संबंधित बातम्या