विदर्भ-मराठवाड्यात जोरदार पावसासह गारपीट; हरभरा पिकाचे मोठे नुकसान
21 February 11:08

विदर्भ-मराठवाड्यात जोरदार पावसासह गारपीट; हरभरा पिकाचे मोठे नुकसान


विदर्भ-मराठवाड्यात जोरदार पावसासह गारपीट; हरभरा पिकाचे मोठे नुकसान

कृषिकिंग, अकोला: हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार विदर्भ, मराठवाड्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अकोला जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसासह गारपीट झाली आहे. अचानक आलेल्या पावसामुळे या भागातील मुख्य हरभरा पिकाला फटका बसण्याची चिन्ह आहेत.

पश्चिम विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातही वादळी वाऱ्यासह गारपीट झाली आहे. मासरूळ या शिवारात अचानक विजेचा कडकडाट होऊन जोरदार वादळी वारा सुटला आणि पाऊस पडायला सुरुवात झाली. दरम्यान पाऊस पडत असताना गारपीट देखील झाली आहे.

जालना जिल्ह्यातील भोकरदन परिसरात आणि अंबड तालुक्यातल्या वडी रामसगाव शिवारात गारांचा पाऊस झाला आहे. जालन्यातील जाफ्राबाद तालुक्यातही तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पाऊस पडला आहे.

रब्बी हंगामातील पिकं सोंगणी करून उघड्यावर पडलेली असल्यानं या पिकांची गंजी झाकण्यासाठी शेतकऱ्यांची मात्र धावा-धाव झाली. आंबा बागांनाही काही प्रमाणात या पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे.

दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी हवामान विभागाने वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याचा अंदाज व्यक्त केला होता. बातमी वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लीक करा. http://www.krushikingnews.com/newsdetails1.php?goytrarenyarjf&100106103संबंधित बातम्या