भारताने निर्यात थांबवल्याने पाकिस्तानात टोमॅटो १८० रुपये प्रति किलो
20 February 18:28

भारताने निर्यात थांबवल्याने पाकिस्तानात टोमॅटो १८० रुपये प्रति किलो


भारताने निर्यात थांबवल्याने पाकिस्तानात टोमॅटो १८० रुपये प्रति किलो

कृषिकिंग, नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या आत्मघातकी हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या विरोधात सर्व स्तरातून रोष व्यक्त केला जातोय. मध्यप्रदेशातील शेतकऱ्यांनी तर पाकिस्तानात टोमॅटो निर्यात करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. या शेतकऱ्यांनी सांगितले आहे की, "आमचा टोमॅटो सडला तरी चालेल पण आम्ही पाकिस्तानात पाठवणार नाही."

शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी निर्यात पूर्णपणे थांबवल्याने पाकिस्तानात टोमॅटोचा दर सध्या १८० रुपये प्रति किलोपर्यंत पोहचला आहे. पाकिस्तानच्या लाहोरमध्ये टोमॅटो १८० रुपये प्रति किलो दराने मिळत आहे. तर तोच टोमॅटो भारतात सध्या १० रुपये किलो दराने उपलब्ध आहे.

केंद्र सरकारनेही पाकिस्तानसोब त असलेले व्यावहारिक संबंध अधिक कडक केले आहेत. सरकारने पाकिस्तानी वस्तूंवर २०० टक्के शुल्क लागू केले आहे. याशिवाय अनेक शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी आपला माल पाकिस्तानात
पाठवणे पूर्णपणे बंद केले आहे. पाकिस्तानात टोमॅटोच्या दरात मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे पाकिस्तानची सर्व स्तरातून मोठी गोची झाली आहे.

टोमॅटोसह बटाटयाच्या दरात ३०-३५ रुपये प्रति किलोपर्यंत वाढ झाली आहे. जो गेल्या आठवड्यापर्यंत १० रुपये प्रति किलो दराने विक्री केला जात होता. याशिवाय अन्य भाजीपाल्याच्या दरात मोठी वाढ झाल्याचे सांगितले जात आहे.

भारत हा पाकिस्तानला सर्वाधिक फळे व भाजीपाला निर्यात करणारा देश आहे. अटारी-बाघा सीमेच्या माध्यमातून या नाशवंत शेतमालाची आयात वाहतुकीच्या दृष्टीने पाकिस्तानला स्वस्तात पडते.संबंधित बातम्या