देशातील १ कोटी शेतकऱ्यांना २४ फेब्रुवारीला पहिल्या टप्प्यातील मदत निधी मिळणार
20 February 16:54

देशातील १ कोटी शेतकऱ्यांना २४ फेब्रुवारीला पहिल्या टप्प्यातील मदत निधी मिळणार


देशातील १ कोटी शेतकऱ्यांना २४ फेब्रुवारीला पहिल्या टप्प्यातील मदत निधी मिळणार

कृषिकिंग, नवी दिल्ली: देशभरातील जवळपास १ कोटी शेतकऱ्यांना २४ फेब्रुवारीला प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेनंतर्गत पहिल्या टप्प्यातील २ हजारांचा मदत निधी दिला जाणार आहे. यावर्षीच्या अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या घोषणेनुसार ६ हजारांची मदत ही तीन टप्प्यात २ हेक्टर व त्यापेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांना दिली जाणार आहे.

कृषी मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, "२४ फेब्रुवारीला उत्तरप्रदेशातील लखनऊ येथे एका शेतकरी रॅलीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी या योजनेचे औपचारिक उदघाटन करणार आहे. २४ फेब्रुवारीला पीएम-किसान पोर्टलमध्ये सर्व पात्र शेतकऱ्यांची माहिती अपलोड केली जाणार आहे. आणि त्यानंतर जवळपास १ कोटी शेतकऱ्यांनी पहिल्या टप्प्यातील मदत वितरित केली जाणार आहे." याशिवाय दुसऱ्या टप्प्यातील मदत ही १ एप्रिल २०१९ रोजी जमा केली जाणार आहे. असेही या अधिकाऱ्याने आहे.संबंधित बातम्या