अर्जेन्टिना कृषी विकास क्षेत्रात महाराष्ट्राला सहकार्य करणार
20 February 10:11

अर्जेन्टिना कृषी विकास क्षेत्रात महाराष्ट्राला सहकार्य करणार


अर्जेन्टिना कृषी विकास क्षेत्रात महाराष्ट्राला सहकार्य करणार

कृषिकिंग, मुंबई: अर्जेन्टिनाचे राष्ट्राध्यक्ष मोरिसिओ मॅक्री सध्या भारताच्या दौऱ्यावर आहे. त्यांनी मुंबई येथे राजभवन येथे राज्यपाल चे. विद्यासागर राव व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. यावेळी अर्जेन्टिना महाराष्ट्राशी करार करून कृषी क्षेत्रात सहकार्य करण्यास तयार असल्याचे राष्ट्राध्यक्ष मोरिसिओ मॅक्री यांनी सांगितले आहे.

अर्जेन्टिना महाराष्ट्रात एक व्यापारी शिष्टमंडळ पाठवून अन्नधान्य साठवणुकीसाठी अर्जेन्टिनाच्या प्रसिद्ध सायलो ब्याग व इतर तंत्रज्ञान देण्याबाबत चर्चा करेल असेही त्यांनी सांगितले आहे. केंद्र सरकारसोबत झालेल्या विविध करारांबाबत माहिती देऊन दहशतवादाविरोधी लढ्यामध्ये आपला देश भारतासोबत कार्य करेल, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली आहे.

दरम्यान, अर्जेन्टिनाचे कृषी विकासात सहकार्य लाभल्यास भारताला शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यास निश्चितपणे मदत होईल, असे राज्यपाल सी. विद्यासागर राव सांगितले आहे.



संबंधित बातम्या