२०-२१ फेब्रुवारीला विदर्भ-मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता
18 February 17:53

२०-२१ फेब्रुवारीला विदर्भ-मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता


२०-२१ फेब्रुवारीला विदर्भ-मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता

कृषिकिंग, मुंबई: विदर्भ आणि मराठवाड्यात २० ते २१ फेब्रुवारी या कालावधीत काही भागांत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होऊ शकतो. असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

अमरावती, अकोला, बुलढाणा आणि वाशीम जिल्ह्यांतील बऱ्याच भागात या काळात मेघ-गर्जनेसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच यवतमाळ, वर्धा, नागपूर, जालना, परभणी, हिंगोली आणि औरंगाबाद जिल्ह्यांतील काही भागांत देखील वादळी पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी गारपीटही होऊ शकते. असा अंदाजही हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांनी या हवामानाच्या परिस्थितीनुसार नियोजन करून शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवावा. बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल तर तो व्यवस्थितपणे झाकून ठेवावा. वादळी पावसाच्या दरम्यान सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. मोकळ्या मैदानात तसेच झाडाखाली अथवा पत्र्याच्या शेडमध्ये थांबणे टाळावे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.



संबंधित बातम्या