सरकारी नोकऱ्यांचं खूळ डोक्यातून काढून टाका- चंद्रकांत पाटील
18 February 12:44

सरकारी नोकऱ्यांचं खूळ डोक्यातून काढून टाका- चंद्रकांत पाटील


सरकारी नोकऱ्यांचं खूळ डोक्यातून काढून टाका- चंद्रकांत पाटील

कृषिकिंग, सांगली: "संगणकीकरण व वाढत्या लोकसंख्येमुळे दिवसेंदिवस सरकारी नोकऱ्या कमी होत आहेत, त्यामुळे सरकारी नोकऱ्यांचं खूळ डोक्यातून काढा. सरकारी नोकरी लागतेच कशाला? तरुणांनी स्वतः रोजगार निर्माण केला पाहिजे." असे मत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले आहे.

सांगली महापालिकेच्या वतीने आयोजित दीनदयाळ अंतोदय योजनेअंतर्गत आयोजित रोजगार मेळाव्यात ते बोलत होते. "तरुण तरुणींनी सरकारी नोकऱ्यांची कल्पना डोक्यातून काढली पाहिजे. वाढत्या लोकसंख्येमुळे सरकारी नोकऱ्या मिळणे कठीण आहे. तरुणांनी खासगी नोकऱ्यांकडे वळले पाहिजे," असा सल्लाही त्यांनी यावेळी तरुणांना दिला आहे.संबंधित बातम्या