उत्तरप्रदेश सरकार गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार
18 February 11:12

उत्तरप्रदेश सरकार गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार


उत्तरप्रदेश सरकार गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार

कृषिकिंग, लखनऊ: फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उत्तर भारतीय राज्यांमध्ये गारपिटीसह झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या झालेल्या नुकसानीसाठी उत्तरप्रदेश सरकारकडून नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. यासंबंधीचे निर्देश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्याच्या सर्व जिल्ह्याधिकाऱ्यांना निर्देश देताना सांगितले आहे की, "राज्यात झालेल्या नुकसानीचा आढावा घेऊन ज्या शेतकऱ्यांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. अशा शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरात लवकर थेट नुकसान भरपाईची रक्कम जमा करावी."

तसेच शेतात काम करताना झालेल्या अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ४ लाख रुपयांचा मदत निधी देण्यात यावा, असे निर्देशही त्यांना यावेळी अधिकाऱ्यांना दिले आहेत.संबंधित बातम्या