दुष्काळ: राज्यात मनरेगाची ४४ हजार कामे सुरु; २ लाख ९६ हजार मजुरांची उपस्थिती- रावल
15 February 10:50

दुष्काळ: राज्यात मनरेगाची ४४ हजार कामे सुरु; २ लाख ९६ हजार मजुरांची उपस्थिती- रावल


दुष्काळ: राज्यात मनरेगाची ४४ हजार कामे सुरु; २ लाख ९६ हजार मजुरांची उपस्थिती- रावल

कृषिकिंग, मुंबई: "दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची (मनरेगा) ४४ हजार ५५५ कामे आहे. या कामांवर जवळपास २ लाख ९६ हजार मजुरांची उपस्थिती आहे. जानेवारी अखेर मजुरांच्या संख्येत ४० हजारांनी वाढली आहे." अशी माहिती रोहयो मंत्री जयकुमार रावल यांनी दिली आहे.

याशिवाय मजुरांना वेळेत मजुरी देण्याचे प्रमाणही वाढले असून, जानेवारी अखेर हे प्रमाण ९४ टक्के इतके आहे. २०१४ मध्ये हे प्रमाण अवघे २६.४३ टक्के इतके होते. असेही ते म्हणाले आहे.

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मागेल त्याला तातडीने काम उपलब्ध करुन देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. मनरेगा योजनेच्या अंमलबजावणीचा सतत आढावा घेतला जात आहे. केंद्र शासनाने राज्यातील दुष्काळग्रस्त भागासाठी मजुरीचे ५० दिवस वाढवून दिले आहेत. जिल्ह्यांना पुरेसा निधी वितरीत करण्यात आला असून जलसंधारणाच्या कामावर भर देण्यात येत आहे. असेही त्यांनी सांगितले आहे.संबंधित बातम्या