दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी १ हजार ४५४ कोटींचा निधी वितरित
15 February 10:34

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी १ हजार ४५४ कोटींचा निधी वितरित


दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी १ हजार ४५४ कोटींचा निधी वितरित

कृषिकिंग, मुंबई: "खरीप हंगामातील अपुऱ्या पर्जन्यमानामुळे राज्यात भीषण दुष्काळाची परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने १५१ तालुक्यात दुष्काळ घोषित केला आहे. या दुष्काळी तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक नुकसानीपोटीचा सुमारे १ हजार ४५४ कोटी रुपयांचा दुसरा हप्ता राज्य सरकारकडून वितरित करण्यात आला आहे." अशी माहिती मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर यांनी दिली आहे.

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पीक नुकसानीची मदत देण्यासाठी २ हजार ९०९ कोटी ५१ लाख ९ हजार रुपयांची मदत वितरित करण्यास मान्यता दिली होती. त्यापैकी मदतीचा पहिला हप्ता यापूर्वीच देण्यात आला आहे. आता उर्वरित १ हजार ४५४ कोटी ७५ लाख ५४ हजार ६८० एवढी रक्कम विभागीय आयुक्तांकडे वर्ग करण्यात आला आहे. ही रक्कम तातडीने पात्र बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे, असेही निंबाळकर यांनी सांगितले आहे.

यामध्ये कोकण विभागाला सुमारे ७.०६ कोटी, नाशिक विभागाला ४४६.४८ कोटी, पुणे विभागाला २०६.५९ कोटी, औरंगाबाद विभागास ५२५.२९ कोटी, अमरावती विभागास २३७.१८ कोटी आणि नागपूर विभागास ३२.१३ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहे. ३१ मार्चपूर्वी सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्याच्या सूचना संबंधित विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांना देण्यात आल्या आहेत. असेही त्यांनी सांगितले आहे.टॅग्स

संबंधित बातम्या