डिंभे धरणाचे पाणी माणिकडोह धरणात सोडण्यासाठी जोड बोगद्यास मान्यता
14 February 12:41

डिंभे धरणाचे पाणी माणिकडोह धरणात सोडण्यासाठी जोड बोगद्यास मान्यता


डिंभे धरणाचे पाणी माणिकडोह धरणात सोडण्यासाठी जोड बोगद्यास मान्यता

कृषिकिंग, मुंबई: डिंभे डाव्या तीर कालव्यातील गळती रोखण्यासाठी व कालव्यातील पाण्याचा शेतकऱ्यांना पुरेपूर वापर फायदा व्हावा. यासाठी डिंभे डाव्या तीर कालव्यास पर्याय म्हणून डिंभे धरणाचे पाणी माणिकडोह धरणात सोडण्यासाठी १६.१० कमी लांबीच्या जोड बोगद्यास मान्यता देण्यात आली आहे.

महाराष्ट्र कृष्णा खोरे महामंडळाच्या नियामक मंडळाच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीला जलसंपदामंत्री गिरीष महाजन, राज्यमंत्री विजय शिवतारे, अहमदनगरचे पालकमंत्री राम शिंदे, महामंडळाचे उपाध्यक्ष नितीन बानगुडे पाटील उपस्थित होते.

सरकारच्या या निर्णयामुळे अहमदनगर जिल्ह्याच्या दुष्काळी भागातील कर्जत, श्रीगोंदा, पारनेर व करमाळा या तालुक्यांना या पाण्याचा फायदा होणार आहे.संबंधित बातम्या