विदर्भात तुरळक ठिकाणी गारपिटीसह पावसाची शक्यता
14 February 11:23

विदर्भात तुरळक ठिकाणी गारपिटीसह पावसाची शक्यता


विदर्भात तुरळक ठिकाणी गारपिटीसह पावसाची शक्यता

कृषिकिंग, मुंबई: गेल्या आठवडाभर राज्यात कुडकुडी भरली असताना आता राज्य तापू लागलं आहे. मुंबईसह राज्यातील शहरांच्या तापमानात वाढ होत आहे. त्यामुळे १४, १५ आणि १६ फेब्रुवारी रोजी विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून, १५ फेब्रुवारी रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी गारपीट होईल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या माहितीनुसार, विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. कोकण-गोव्याच्या काही भागांत व मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या उर्वरित भागात किमान तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. कोकण-गोव्याच्या उर्वरित भागात किमान तापमानात किंचित वाढ झाली आहे.टॅग्स

संबंधित बातम्या