...ही कंपनी आता घरपोच फळे, भाजीपाल्याची विक्री करणार
16 February 14:50

...ही कंपनी आता घरपोच फळे, भाजीपाल्याची विक्री करणार


...ही कंपनी आता घरपोच फळे, भाजीपाल्याची विक्री करणार

कृषिकिंग, पुणे: मोठ्या शहरांमध्ये बाजारात जाऊन फळे, भाजीपाला विकत घ्यायला ग्राहकांकडे वेळ नसतो. बऱ्याचदा Grofers किंवा Big Basket मधून भाज्या, धान्य मागवलं जातं. पण आता या कंपन्यांना स्पर्धा द्यायला एक नवी कंपनी तयार झाली आहे.

स्विगी या ऑनलाईन विक्री करणाऱ्या कंपनीने आता स्विगी स्टोअर्सची सुरुवात केली आहे. रोजच्या लागणाऱ्या गोष्टी ही कंपनी घरपोच करणार आहे. यामध्ये विशेषतः फळे, भाजीपाला, किराणा माल, सुपर मार्केट, आरोग्यासाठी लागणाऱ्या गोष्टी असं सर्व काही स्विगीकडे मिळणार आहे.

आतपर्यंत स्विगी खाण्याचे पदार्थ आणि अनेक प्रकारच्या वस्तू घरपोच देत होती. ती सेवा तशीच सुरू राहणार आहे. याशिवाय आता फळे भाजीपाल्यासह किराणामालमध्येही या कंपनीनं उडी मारली आहे.

कंपनीचे मुख्य अधिकारी श्रीहर्ष मजेती यांनी सांगितले आहे की, स्विगी अन्नपदार्थ घरीपोच डिलिव्हर करत होतीच. पण आता आम्ही आमचा व्यवसाय वाढवायचा ठरवलं आहे. ग्राहकांना आता जास्त सुविधा मिळणार आहे.टॅग्स

संबंधित बातम्या