विनातारण शेती कर्ज मर्यादावाढीचा राज्यातील एक काेटी शेतकऱ्यांना फायदा
17 February 13:00

विनातारण शेती कर्ज मर्यादावाढीचा राज्यातील एक काेटी शेतकऱ्यांना फायदा


विनातारण शेती कर्ज मर्यादावाढीचा राज्यातील एक काेटी शेतकऱ्यांना फायदा

कृषिकिंग, पुणे: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने गेल्या आठवड्यात द्विमासिक पतधोरण जाहीर केले. यामध्ये आरबीआयने देशातील लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी असलेली विनातारण शेती कर्जाची मर्यादा ६० हजार रुपयांंनी वाढवली आहे. ती सध्याच्या एक लाख रुपयांवरून आता १ लाख ६० हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील साधारण एक काेटी शेतकऱ्यांना फायदा होईल. त्याचबराेबर शेतीतील गुंतवणूक वाढून कृषी अर्थव्यवस्था अधिक सुदृढ हाेण्याची आशा कृषीतज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

गेल्या दाेन वर्षांतील राज्याच्या कृषी पतधाेरणावर विचार करता, साधारणतः १ काेटी ४० लाख शेतकरी दरवर्षी पीक कर्ज घेतात. २०१७-१८ या हंगामासाठी १ काेटी ३६ लाख शेतकऱ्यांनी कर्ज घेतले हाेते. तर २०१८-१९ या हंगामात ५ लाख ७९ हजार ४६४ काेटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले. साधारण १ काेटी ४० लाख शेतकऱ्यांनी २०१८-१९ या हंगामात पीक कर्जाचा लाभ घेतला. कृषी विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यापैकी ८० टक्के शेतकरी हे एक लाखाच्या आतील कर्ज मर्यादेत हाेते. ही बाब लक्षात घेतली तर जवळपास एक काेटी शेतकऱ्यांना रिझर्व्ह बँकेच्या नव्या निर्णयाचा फायदा हाेणार आहे.टॅग्स

संबंधित बातम्या