पंतप्रधान कृषी योजनेच्या ६ हजारांसाठी लहान भावाकडून मोठ्या भावाची हत्या
12 February 18:47

पंतप्रधान कृषी योजनेच्या ६ हजारांसाठी लहान भावाकडून मोठ्या भावाची हत्या


पंतप्रधान कृषी योजनेच्या ६ हजारांसाठी लहान भावाकडून मोठ्या भावाची हत्या

कृषिकिंग, नागपूर: मोदी सरकारने अर्थसंकल्पात अल्पभूधारक शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार मदत निधी देण्याची घोषणा केली. मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी लहान भावाने मोठ्या भावाची हत्या केल्याची घटना नागपुरात समोर आली आहे.

पंतप्रधान कृषी सन्मान योजनेसाठी ५ एकराच्या आत शेती असलेल्या शेतकऱ्यांची यादी आणि सातबारा ग्रामपंचायतीकडून मागवण्यात आला होता. नागपूरच्या टेलकामठी येथील शेतकरी रमेश वाडीकर आणि गणेश वाडीकर हे दोघे भाऊ त्यासाठी पात्र ठरले. त्यांच्याकडे चार एकर शेती आहे. मात्र जमीन क्षेत्र एक असल्याने दोघांकडे असलेला सातबारा वेगळा नाही. त्यामुळे या दोघांपैकी कोणत्या तरी एका भावाला या योजनेचा लाभ मिळणार होता. यासाठी दोन्ही भावांनी स्वतःचे बँक पासबुक खात्याची प्रत ग्रामपंचायत कार्यालयात शनिवारी जमा केली.

मात्र योजनेचा लाभ मीच घेणार या मुद्द्यावरून या दोघांमध्ये भांडण झाले. वाद एकाच भांडणावर थांबला नाही तर संध्याकाळीही या दोघांमध्ये वादावादी झाली. हा वाद विकोपाला गेल्यानंतर लहान भाऊ गणेश वाडीकर याने त्याच्या मोठ्या भावावर म्हणजेच संतोष वाडीकरच्या डोक्यावर दगडाने प्रहार केला. यामुळे संतोष वाडीकर जखमी झाला. हा प्रकार पाहिलेल्या गावकऱ्यांनी तातडीने संतोषला सावनेर येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केलं. डॉक्टरांनी त्याची तपासणी केल्यावर त्याला मृत घोषित केलं.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी गणेश वाडीकरला अटक केली. गणेशला कोर्टातही हजर करण्यात आलं होतं. कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.



संबंधित बातम्या