७९ जिल्ह्यांमधील पाणी घातक; बेसुमार उपसा, रासायनिक खतांचा भडिमार मुख्य कारण
13 February 08:30

७९ जिल्ह्यांमधील पाणी घातक; बेसुमार उपसा, रासायनिक खतांचा भडिमार मुख्य कारण


७९ जिल्ह्यांमधील पाणी घातक; बेसुमार उपसा, रासायनिक खतांचा भडिमार मुख्य कारण

कृषिकिंग, औरंगाबाद: भूगर्भातील पाण्याच्या अपरिमित उपशामुळे केवळ भूजल पातळी खालावत नाही. तर खोल गेलेले पाणी युरेनियमने प्रदूषित झाले आहे. त्यास रासायनिक खतांचा भडिमार हे पण एक कारण समोर आले आहे. आरोग्यास घातक असणाऱ्या या पाण्याचे नमुने तपासण्यासाठी केंद्र शासनाने भाभा अणुसंशोधन केंद्राच्या मदतीने १६ राज्यांतल्या ७९ जिल्ह्यांतील १ लाख २० हजार पाण्याचे नमुने तपासण्यास सुरुवात केली आहे. यात मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड आणि परभणी या ४ जिल्ह्यांचा समावेश आहे.

देशातील अनेक भागांमध्ये बोअरची पाणीपातळी सध्या ६०० ते ७०० फुटांपेक्षा जास्त खोलवर पोहोचली आहे. रासायनिक खतांचा अत्याधिक वापरही हाताबाहेर गेला आहे. यामुळे युरेनियमचा धोका वाढला आहे. त्यामुळे भाभाने १६ राज्यांतील ७९ जिल्ह्यांचे सर्वेक्षण करून तेथील नमुने गोळा करण्यास सुरुवात केली आहे. पावसाळापूर्व व नंतरच्या नमुन्यांच्या चाचण्या केल्या जात आहेत.

युरेनियमचा अंश असणारे पाणी अतिघातक आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्धारित क्षमतेपेक्षा अधिक प्रमाणात युरेनियममिश्रित पाण्यामुळे त्वचा, यकृत व थायरॉइडचा कर्करोग, रक्ताचा कर्करोग, डिप्रेशन, यकृत निकामी होणे, फुफ्फुसाचे किडनीचे आजार, ब्लू बेबी सिंड्रोम यासारखे धोके संभवतात.संबंधित बातम्या