मला शेती कळत नाही. पण, शेतकऱ्यांचं दुःख कळतं- आदित्य ठाकरे
12 February 15:24

मला शेती कळत नाही. पण, शेतकऱ्यांचं दुःख कळतं- आदित्य ठाकरे


मला शेती कळत नाही. पण, शेतकऱ्यांचं दुःख कळतं- आदित्य ठाकरे

कृषिकिंग, उस्मानाबाद: शिवसेना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे सध्या राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांना आधार देत आहे. मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबादसह पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर या दुष्काळाची भीषणता अधिक असलेल्या जिल्ह्यातील गावागावात जाऊन ते शेतकऱ्यांना धीर देत आहे.

दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांच्या घरात खायला दाणा नाही, गुरांना चारा नाही. प्यायला पाणी नाही. मात्र, शिवसेना तुमच्यासोबत आहे, असे सांगताना ते म्हणाले आहे की, "मी शहरी बाबू, मला शेती कळत नाही. मात्र, शेतकऱ्यांचं दुःख कळतं. तुम्ही आत्महत्येचा विचार मनात आणू नका. तुम्ही कधीही आवाज द्या, शिवसेना तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. त्यामुळे मी राज्यभर दुष्काळी भागात जाऊन शेतकऱ्यांना भेटतो आहे.

निवडणूका येतील-जातील. मात्र, सर्वसामान्य शेतकरी पाणीटंचाई चारा टंचाईने त्रस्त असताना शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी कधीही खंबीरपणे उभी असेल. असे सांगत आदित्य ठाकरे यांनी शेतकऱ्यांना आधार दिला आहे. याशिवाय शिवसेनेकडून राज्यातील दुष्काळी भागात शेतकऱ्यांच्या जनावरांना पशुखाद्य वाटप, चारा, पिण्याच्या पाण्याची टाक्या वाटप केलं जात आहे.संबंधित बातम्या