दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी २ हजार कोटींचा अतिरिक्त निधी
12 February 14:40

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी २ हजार कोटींचा अतिरिक्त निधी


दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी २ हजार कोटींचा अतिरिक्त निधी

कृषिकिंग, मुंबई: राज्यात निर्माण झालेल्या भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य सरकारकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी महाराष्ट्र आकस्मिकता निधीच्या मर्यादेत दोन हजार कोटी रुपयांची तात्पुरत्या स्वरुपातील वाढ करण्यात आली आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.

ही रक्कम दुष्काळग्रस्तांच्या खात्यात जमा करण्यासाठी तात्काळ कार्यवाही सुरू करण्याचे आदेशही यावेळी देण्यात आले आहेत. याशिवाय पशुपालकांच्या दारापर्यंत पशुआरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी राज्यात ३४९ फिरते पशुवैद्यकीय चिकित्सालय स्थापन करण्यासाठी मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात दुर्गम भागात ८० चिकित्सालये स्थापन करण्यात येणार आहे.टॅग्स

संबंधित बातम्या