...जेव्हा मुख्यमंत्र्यांच्या पत्नी बैलगाडी चालवतात
12 February 14:18

...जेव्हा मुख्यमंत्र्यांच्या पत्नी बैलगाडी चालवतात


...जेव्हा मुख्यमंत्र्यांच्या पत्नी बैलगाडी चालवतात

कृषिकिंग, पुणे: फुलांनी सजवलेल्या, शिंगाना गुलाबी रंगांचे गोंडे बांधलेल्या, ऐटदार खिल्लारी बैलजोडी असलेली बैलगाडी चालवण्याचा आंनद मुख्यमंत्र्यांच्या सौभाग्यवती अमृता फडणवीस यांनी घेतला. ज्यावेळी अमृता फडणवीस यांनी बैलांचा कासरा आपल्या हातात घेतला आणि बैलगाडी चालविण्यास सुरुवात केली तेव्हा उपस्थितांच्या भुवया आश्चर्याने उंचावल्या.

पुण्यातील भोसरी येथील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहाशेजारील गावजत्रा मैदानावर शिवांजली महिला बचत गटाच्या वतीने गायजत्रा मैदानावर इंद्रायणी थडी जत्रेस फडणवीस यांनी भेट दिली. त्यावेळी त्यांनी बैलगाडी चालवताना बैलांचे कासरे आपल्या हाती घेत स्त्री ही अबला नसून सबला आहे. हिरकणीसारखी साधी स्त्री आपल्या बाळासाठी कोणत्याही अग्निदिव्याला सामोरी गेली. स्त्रिया प्रत्येक संकटाला धैयार्ने तोंड देतात. असे सांगितले आहे.

"आपल्या महिला बचतगटांमधील स्त्रिया प्रामाणिकपणे जे काम करतात त्याला तोड नाही. त्यात त्यांची जिद्द दिसून येते. नाहीतर आजकाल मोठ्या मोठ्या कंपन्यादेखील बँकांकडून कर्ज घेऊन ती बुडवतात. पण महिला बचतगटांतील महिला त्यांच्या कर्जाची प्रामाणिकपणे परतफेड करतात. आपल्या आर्थिक बाबींमध्ये स्त्रियांचा जास्त हातभार असेल तर देश पुन्हा एकदा नक्कीच सोने की चिडीया बनू शकेल." असेही त्या यावेळी म्हणाल्या आहेत.संबंधित बातम्या