आणखी ४५०० गावांत दुष्काळी उपाययोजना; शेतकऱ्यांचा रोष टाळण्यासाठी सरकारचा निर्णय
12 February 12:00

आणखी ४५०० गावांत दुष्काळी उपाययोजना; शेतकऱ्यांचा रोष टाळण्यासाठी सरकारचा निर्णय

आणखी ४५०० गावांत दुष्काळी उपाययोजना; शेतकऱ्यांचा रोष टाळण्यासाठी सरकारचा निर्णय

कृषिकिंग, मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर दुष्काळी भागातील जनतेचा रोष कमी करण्यासाठी राज्य सरकारने आणखी ४ हजार ५०० गावांमध्ये दुष्काळी उपाययोजना सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकाराच्या काही अटींमुळे दुष्काळी निकषात न बसणाऱ्या या ४ हजार ५०० गावांमध्ये राज्य सरकार स्वतःचा निधीतून उपाययोजना सुरु करणार आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने राज्यातील दुष्काळी भागासाठी ४ हजार ७१४ कोटींच्या मदत निधीची घोषणा केली आहे. मात्र, हा मदत निधी राज्य सरकारला अजूनही मिळालेला नाही. त्यामुळे राज्य सरकारने आपल्या आकस्मीक निधीतून ४ हजार कोटी उचलून दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसाठी मदत योजना सुरु केल्या आहेत. त्यासोबतच आता या नवीन ४ हजार गावांमध्येही राज्य सरकारकडून दुष्काळी उपाययोजना राबवल्या जाणार आहेत.टॅग्स

संबंधित बातम्या