मोदींनंतर फडणवीस सरकार शेतकऱ्यांसाठी घेणार मोठा निर्णय; वाचा काय आहे बातमी
12 February 11:16

मोदींनंतर फडणवीस सरकार शेतकऱ्यांसाठी घेणार मोठा निर्णय; वाचा काय आहे बातमी


मोदींनंतर फडणवीस सरकार शेतकऱ्यांसाठी घेणार मोठा निर्णय; वाचा काय आहे बातमी

कृषिकिंग, मुंबई: केंद्र सरकारने केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता राज्य सरकारही शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मोठी घोषणा करण्याच्या तयारीत आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान योजना याअंतर्गत मिळणाऱ्या मदतीसाठी केंद्र सरकारकडून हेक्टरी मर्यादा ठेवण्यात आली आहे. ही मर्यादा वाढवण्याचा वा काढूनच टाकण्याचा राज्य सरकार विचार करत असल्याची माहिती आहे. आज होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत या संदर्भात चर्चा होणार आहे.

दरम्यान, केंद्र सरकारनं केलेल्या मदतीच्या घोषणेनंतर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी शेतकऱ्यांना वाढीव मदत केली जाऊ शकते. असे म्हटले होते. यामध्ये राज्य सरकार आपापल्या परीने वाढ करू शकतात. असेही त्यांनी यावेळी सांगितले होते. त्यामुळे केंद्राबरोबरच राज्य सरकारही शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत करणार का, याकडे आता लक्ष लागलेलं आहे.

काय आहे प्रधानमंत्री किसान सन्मान योजना?
दोन हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांसाठीच ही योजना लागू होणार आहे. पण विदर्भ आणि मराठवाड्यातील बहुतांश शेतकऱ्यांकडे कोरडवाहू शेती असली तरी ती दोन हेक्टर म्हणजे पाच एकरपेक्षा अधिक आहे. आणि सध्या या भागात तीव्र दुष्काळ आहे. त्यामुळे दोन हेक्टरची मर्यादा वाढविण्याची किंवा ती काढून टाकण्याची तसंच रक्कम वाढविण्याची मागणी या भागांतील आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून केली आहे. त्यामुळे आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत काही निर्णय होतोय, हे पाहावं लागणार आहे.संबंधित बातम्या