पंतप्रधान मोदी बटन दाबणार; शेतकऱ्यांच्या खात्यात २ हजार रुपये जमा होणार
12 February 10:28

पंतप्रधान मोदी बटन दाबणार; शेतकऱ्यांच्या खात्यात २ हजार रुपये जमा होणार

पंतप्रधान मोदी बटन दाबणार; शेतकऱ्यांच्या खात्यात २ हजार रुपये जमा होणार

कृषिकिंग, नवी दिल्ली: लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मोदी सरकारने अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस पाडला. आता त्या अंमलात आणण्याची तयारी सरकार करत आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्यास २५ फेब्रुवारीला पंतप्रधान मोदींच्या हस्ते शुभारंभ होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

२५ फेब्रुवारीला पंतप्रधान मोदी गोरखपूरमध्ये शेतकऱ्यांच्या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहे. निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याआधी अर्थसंकल्पातील घोषणांची अंमलबजावणी करण्यासाठी सरकार प्रयत्नरत आहे. या कार्यक्रमात मोदी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पाठवण्याच्या योजनेला सुरुवात करण्याची शक्यता आहेत. या योजनेत शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट २ हजार रुपये पोहचणार आहे.संबंधित बातम्या