साखरेचा दर क्विंटलमागे २०० ते ४०० रुपयांनी वाढणार; सरकारच्या हालचाली सुरु
11 February 15:29

साखरेचा दर क्विंटलमागे २०० ते ४०० रुपयांनी वाढणार; सरकारच्या हालचाली सुरु


साखरेचा दर क्विंटलमागे २०० ते ४०० रुपयांनी वाढणार; सरकारच्या हालचाली सुरु

कृषिकिंग, नवी दिल्ली: चालू गाळप हंगामातही मोठ्या प्रमाणात साखर उत्पादन होण्याची शक्यता आहे. त्यातच कारखाने थकीत रकमेची एफआरपी देण्यात अपयशी ठरत आहेत. यासाठी केंद्र सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना व कारखान्यांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहे. साखर किमान आधारभूत दरात वाढ करण्याचा निर्णय लवकरच घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे साखरेच्या दरात क्विंटलमागे २०० ते ४०० रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे.

देशात साखरेचे विक्रमी उत्पादन होत असल्याने लाखो टन साखर शिल्लक आहे. साखर कारखान्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी यापूर्वी सरकारने जून महिन्यात साखरेचा २९०० रुपये प्रति क्विंटल इतका किमान दर ठरवून दिला होता. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शेतकरी व साखर कारखान्यांना वाचवण्याससाठी पुन्हा एकदा वाढ केली जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, एफआरपीच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी नीती आयोगाने टास्क फोर्स कृती दलाची स्थापना केली आहे.



टॅग्स

संबंधित बातम्या