शेतमजुराच्या अपघाताची जबाबदारी आता शेतमालकावर; भरपाई द्यावी लागणार
11 February 14:48

शेतमजुराच्या अपघाताची जबाबदारी आता शेतमालकावर; भरपाई द्यावी लागणार


शेतमजुराच्या अपघाताची जबाबदारी आता शेतमालकावर; भरपाई द्यावी लागणार

कृषिकिंग, मुंबई: शेतात काम करताना अपघात झाल्यास, जखमी शेतमजुरास किंवा मृत शेतमजुराच्या वारसास यापुढे शेतमालकाला नुकसान भरपाई, सानुग्रह अनुदान किंवा मृताच्या वारसाला काम द्यावं लागणार आहे. कामाच्या ठिकाणी कामगाराला सुरक्षा मिळावी. यासाठी स्वतंत्र धोरणाचा मसुदा राज्याच्या कामगार विभागाने तयार केला असून, यासंदर्भातील नवे धोरण लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

राज्यात वर्ष २०१७ च्या जुलै ते ऑक्टोबर या चार महिन्यांत कीटकनाशक फवारणीने ५१ शेतकरी-मजुरांचा मृत्यू झाला होता. त्यातील २१ मृत्यू कापूस उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील होते. तर राज्यभर कीटकनाशक विषबाधेच्या ८०० घटनांची नोंद झाली होती. त्यावर २०१७ च्या हिवाळी विधानसभेत चर्चा झाली होती. त्या वेळी कामगारमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी शेतमजुरांच्या सुरक्षिततेसाठी स्वतंत्र धोरण बनवण्यात येईल, असे जाहीर केले होते.

त्यानुसार कामगार विभागाने कामाच्या ठिकाणी सुरक्षा, आरोग्य व वातावरण यासंदर्भातल्या एका धोरणाचा १९ पानांचा मसुदा तयार केला आहे. अशी माहिती कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली आहे.

यापूर्वी शेतीमधील अपघाती घटनांसंदर्भात अनुदान किंवा भरपाई राज्य सरकार देत होते. यापुढे ती जबाबदारी शेतकऱ्यांवर टाकण्यात येणार आहे. शिवाय मजुरांची ठराविक कालावधीत वैद्यकीय तपासणी करावी लागेल.संबंधित बातम्या