महाराष्ट्राला रेशीम शेती उद्योगासाठी उदयोन्मुख राज्याचा पुरस्कार
11 February 11:13

महाराष्ट्राला रेशीम शेती उद्योगासाठी उदयोन्मुख राज्याचा पुरस्कार


महाराष्ट्राला रेशीम शेती उद्योगासाठी उदयोन्मुख राज्याचा पुरस्कार

कृषिकिंग, नवी दिल्ली: रेशीम शेती उद्योग क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरीसाठी महाराष्ट्राला उदयोन्मुख राज्याचा पुरस्कार मिळाला आहे. केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज आणि वस्त्रोद्योग मंत्री स्मृती ईरानी यांच्या हस्ते हा पुरस्कार महाराष्ट्राला प्रदान करण्यात आला आहे. राज्याच्या रेशीम संचालनालयाच्या संचालक भाग्यश्री बानायत यांनी हा पुरस्कार स्वीकारला आहे.

नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या केंद्रीय रेशीम बोर्डाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज उपस्थित होत्या. याशिवाय केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती ईराणी, केंद्रीय रेशीम बोर्डचे अध्यक्ष हनमंत रायप्पा हेही उपस्थित होते.टॅग्स

संबंधित बातम्या