दुर्दैवी घटना; विजेची तार पडून नऊ गायींचा मृत्यू
09 February 18:17

दुर्दैवी घटना; विजेची तार पडून नऊ गायींचा मृत्यू


दुर्दैवी घटना; विजेची तार पडून नऊ गायींचा मृत्यू

कृषिकिंग, अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्याच्या संगमनेर तालुक्यातील कनोली येथील वाबळे वस्तीवरील गोठ्यावर धोकादायक वीज वाहक तार पडून नऊ गायींचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

कनोली गावातील वाबळे वस्तीवरील नानासाहेब ठकाजी वर्पे यांच्या मालकीच्या गायींच्या गोठ्यावर आज (शनिवारी) पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास कनोली वाहिनीवरील ११ केव्ही विद्युत वाहिनीची तार तुटुन गोठ्यावर पडली. यावेळी गोठ्यात बांधलेल्या नऊ गायींचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे या शेतकऱ्याच्या पशुधनाचे मोठे नुकसान झाले आहे.

सुदैवाने वर्पे कुटुंबीय गोठ्यात जाण्यापूर्वी दुर्घटना लक्षात आल्याने घरातील कोणीही गोठ्यात गेले नाही. संबंधित घटनेची माहिती नानासाहेब वर्पे यांनी महावितरण कंपनीच्या योगेश सोनवणे यांना कळविली. सोनवणे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन वीज प्रवाह खंडीत केला. या घटनेत नानासाहेब वर्पे यांच्या नऊ गायींचा मृत्यू झाल्याने सुमारे आठ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती समजताच गावात आणि परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.



संबंधित बातम्या