उपोषणामुळे किडनीवर परिणाम; पुणतांब्यातील कृषिकन्यांचे आंदोलन मागे
09 February 17:40

उपोषणामुळे किडनीवर परिणाम; पुणतांब्यातील कृषिकन्यांचे आंदोलन मागे


उपोषणामुळे किडनीवर परिणाम; पुणतांब्यातील कृषिकन्यांचे आंदोलन मागे

कृषिकिंग, पुणतांबा(अहमदनगर): सरकारने शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पूर्ण न केल्याच्या निषेधार्थ पुणतांबा येथे सुरु असलेले अन्नत्याग आंदोलन शेतकऱ्यांच्या लेकींनी अखेर मागे घेतले आहे. उपोषणामुळे किडनीवर परिणाम होत असल्याने राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

मंत्री खोतकर यांनी या कृषिकन्यांची मनधरणी करत मागण्यांसाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. अर्जुन खोतकर यांच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्याचा निर्णय या मुलींनी घेतला आहे.

निकिता जाधव, शुभांगी जाधव, पूनम जाधव या कृषिकन्यांसह काही महिला ५ दिवसांपासून उपोषणाला बसल्या आहेत. यापैकी शुभांगी जाधव हिला आंदोलनाचा पाचव्या दिवशी (काल) प्रकृती खालावल्याने जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले होते. त्यानंतर रात्री उशिरा आंदोलक कृषिकन्या निकीता जाधव, पुनम जाधव यांना बळजबरीने रूग्णालयात हलवल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. आणि त्यामुळे आज दिवसभर पुणतांब्यात कडकडीत बंद पाळण्यात आला.

तर काल दुपारी नगराचे पालकमंत्री राम शिंदे यांनी या कृषिकन्यांची भेट घेऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. परंतु कृषिकन्यांनी स्पष्ट नकार दिल्याने त्यांची शिष्टाई असफल ठरली होती.संबंधित बातम्या