गारपिटीने उत्तर भारतातील हजारो एकरावरील बटाटा पिकाचे मोठे नुकसान
10 February 13:00

गारपिटीने उत्तर भारतातील हजारो एकरावरील बटाटा पिकाचे मोठे नुकसान


गारपिटीने उत्तर भारतातील हजारो एकरावरील बटाटा पिकाचे मोठे नुकसान

कृषिकिंग, नवी दिल्ली: उत्तर भारतातील बटाटा उत्पादक शेतकऱ्यांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे. आधीच बटाट्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. त्यातच आता गारांसह जोरदार पाऊस झाल्याने उत्तर भारतातील हजारो एकरावरील बटाटा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.

उत्तरप्रदेशातील मेरठ जिल्ह्यातील बहचौला गावचे बटाटा उत्पादक शेतकरी अंबुज शर्मा यांनी सांगितले आहे की, "२ एकरात बटाट्याची लागवड केली होती. मात्र, गारपीट झाल्याने हाती आलेले पीक पूर्णपणे नष्ट झाले आहे. याआधीच भाव मिळत नव्हता, त्यात आता गारपिटीने पिकांचे पूर्णपणे नुकसान झाले आहे."

या शेतकऱ्याने सांगितले आहे की, "दिल्लीच्या आझादपूर बाजार समितीत बटाट्याला प्रति क्विंटल ३०० ते ५०० इतका कमी दर मिळत आहे. त्यामुळे उत्पादन खर्च व वाहतूक खर्च मिळणेही अवघड झाले आहे. इतका कमी दर मिळत असताना आता डागाळलेला बटाटा कोण खरेदी करणार? असा प्रश्नही या शेतकऱ्याने उपस्थित केला आहे."

पंजाबच्या लुधियाना जिल्ह्यातील शेतकरी धर्मेंद्र गिल यांनी सांगितले आहे की, "५ एकरात बटाट्याची लागवड केली. मात्र, अचानक झालेल्या गारपिटीमुळे पिकाचे ६० ते ७० टक्के नुकसान झाले आहे. याशिवाय बटाटा डागाळला असून, त्याची गुणवत्ता खराब झाली आहे. या शेतकऱ्याने सांगितले आहे की, जिल्ह्यातील बटाटा पीक पूर्णपणे खराब झाले आहे."



टॅग्स

संबंधित बातम्या