हिमाचल प्रदेशचा अर्थसंकल्प सादर; शेतकऱ्यांसाठी अनेक महत्वपूर्ण घोषणा
09 February 16:05

हिमाचल प्रदेशचा अर्थसंकल्प सादर; शेतकऱ्यांसाठी अनेक महत्वपूर्ण घोषणा


हिमाचल प्रदेशचा अर्थसंकल्प सादर; शेतकऱ्यांसाठी अनेक महत्वपूर्ण घोषणा

कृषिकिंग, हिमाचल प्रदेश: हिमाचल प्रदेश सरकारने आपला यावर्षीचा अर्थसंकल्प सादर केला आहे. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी अर्थसंकल्प सादर करताना कृषी क्षेत्रासाठी अनेक घोषणा केल्या आहेत. त्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी ५० पैसे प्रति युनिट दराने वीज मिळणार आहे. यापूर्वी हिमाचल प्रदेशातील शेतकऱ्यांना ७५ पैसे प्रति युनिट दराने वीजपूरवठा केला जात होता.

याशिवाय फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांनाही दिलासा देण्यात आला आहे. फुलवाहतुकीसाठी मालभाड्यात ३० टक्क्यांनी सूट देण्यात आली आहे. राज्यातील शेतकऱ्यांना देशी गायींच्या खरेदीसाठी ५० टक्के अनुदान, तर शेळ्यांच्या खरेदीसाठी ८५ टक्क्यांपर्यंत अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली आहे. मुर्हा प्रजातीच्या म्हंशींसाठी राज्यात फार्म उभारण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी अर्थसंकल्पात पॉलिहाऊस योजनेचीही घोषणा केली आहे. या योजनेअंर्तगत हिमाचल प्रदेशात ५ हजार नवीन पॉलिहाऊस उभारण्यात येणार आहे. तसेच पॉलिहाऊससाठी शेतकऱ्यांना ८५ टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे.

याशिवाय पिकांचे जंगली प्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठीच्या उपकरणांसाठी ५० टक्क्यांपर्यंत अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली आहे.संबंधित बातम्या