शेतकऱ्यांच्या लेकींचं आंदोलन बळजबरीने दडपलं; पुणतांब्यात कडकडीत बंद
09 February 12:27

शेतकऱ्यांच्या लेकींचं आंदोलन बळजबरीने दडपलं; पुणतांब्यात कडकडीत बंद

शेतकऱ्यांच्या लेकींचं आंदोलन बळजबरीने दडपलं; पुणतांब्यात कडकडीत बंद

कृषिकिंग, पुणतांबा(अहमदनगर): पुणतांबा इथे शेतकऱ्यांच्या मुलींनी पुकारलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा ६ वा दिवस आहे. हे आंदोलन संपवण्यासाठी पोलीस आणि महसुल प्रशासनाकडून दडपशाही करण्यात आली आहे.

आंदोलनाच्या पाचव्या दिवशी प्रकृती खालावल्याने शुभांगी जाधव हिला जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले होते. त्यानंतर रात्री उशिरा आंदोलक कृषिकन्या निकीता जाधव, पुनम जाधव यांना बळजबरीने रूग्णालयात हलवल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

पुणतांबेमधील उपोषणस्थळावरचा मंडपही काढण्यात आला आहे. तर पोलिसांच्या दडपशाहीविरोधात ग्रामस्थांनी आज पुणतांबे बंदची हाक देत कडकडीत बंद पाळला आहे.संबंधित बातम्या