अभिनेता धर्मेंद्र घेतायेत कांदा, मकाचे पीक; लेकीला भाजीपाला पाठवला
10 February 11:00

अभिनेता धर्मेंद्र घेतायेत कांदा, मकाचे पीक; लेकीला भाजीपाला पाठवला


अभिनेता धर्मेंद्र घेतायेत कांदा, मकाचे पीक; लेकीला भाजीपाला पाठवला

कृषिकिंग, पुणे: बॉलिवूडचे अनेक अभिनेत्यांना शेतात काम करायला आवडतं. अर्थात हौस म्हणून का असेना. अनेक अभिनेत्यांकडे स्वत:ची शेती आहे आणि वेळ मिळाला तसे ते शेतात काम करतात. यामध्ये अभिनेते धर्मेन्द्र, नाना पाटेकर, अमिताभ बच्चन, नवाजुद्दीन सिद्दीकी, अभिनेत्री जुही चावला अशी काही नावे यात प्रामुख्याने समोर येतात.

अभिनेते धर्मेंद्र ८३ वर्षांचे आहेत. मात्र, ते आपला बरासचा वेळ सध्या शेतात घालवत असल्याचे समोर आले आहे. धर्मेंद्र स्वत: शेतकरी कुटुंबातले असून, ते अनेकदा आपल्या इन्स्टाग्रामवर शेतातले व्हिडिओ अपलोड करत असतात. मात्र, आता ते चर्चेत आले आहे. ते त्यांची मुलगी ईशा देओलने शेअर केलेल्या फोटोमुळे.

ईशा देओल सध्या खूप खूश आहे. तिच्या लाडक्या वडिलांनी तिला खास गिफ्ट पाठवलं आहे. हे गिफ्ट काय आहे, हे ऐकून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. धर्मेंद्र यांनी ईशाला ताजा भाजीपाला भेट म्हणून पाठवला आहे.

धर्मेंद्र यांनी आपल्या शेतातील वांगी, कांदे आणि मकाची कणसं मुलगी ईशाला पाठवली आहे. ईशानं त्याचा फोटो इन्स्टाग्रामवर टाकला आहे. या फोटोसोबत तिनं लिहिलंय की, पप्पांनी थेट आमच्या शेतातून ताज्या भाज्या पाठवल्या आहेत. या ताज्या भाज्या आशीर्वादापेक्षा कमी नाहीत. दरम्यान, या फोटोतून मुलीचे आपल्या शेतकरी वडिलांप्रती आणि शेतकरी वडिलांचे आपल्या मुलीप्रती असलेले प्रेम व्यक्त होताना दिसत आहे.संबंधित बातम्या