आखाती देशांकडून कोकणच्या हापूसवर कठोर निर्बंध
09 February 11:20

आखाती देशांकडून कोकणच्या हापूसवर कठोर निर्बंध


आखाती देशांकडून कोकणच्या हापूसवर कठोर निर्बंध

कृषिकिंग, रत्नागिरी: कोकणच्या प्रसिद्ध हापूस आंब्याच्या निर्यातीवर युरोपीय देशांनी घातलेली बंदी उठवून वर्ष-दोन वर्षे उलटत नाहीत, तोच आता आखाती देशांनी हापूसवर कठोर निर्बंध लादले आहेत.

बुरशीसाठी वापरण्यात येणारे कार्बन डेझीम, कीटकनाशक म्हणून वापरले जाणारे क्लोरो पायरीफोस या औषधांवर आखाती देशांनी बंदी आणली आहे. फवारणीनंतर या कीटकनाशकांचा प्रभाव फळांमध्ये राहत असल्याने आणि तो शरीरासाठी अपायकारक असल्याने ही कीटकनाशके फवारलेला आंबा न स्वीकारण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

मुंबईतील वाशी मार्केटमधून आखाती प्रदेशात आंबा निर्यात करण्यापूर्वी ‘कोडॅक्स’ कंपनीकडून त्याची तपासणी करण्यात येते. काही दिवसांपूर्वीच कोकणातून पाठविण्यात आलेला आंबा मुंबई मार्केटमधून दुबईसाठी निर्यात करण्यात आला. त्या फळांच्या निर्यातीपूर्वी करण्यात आलेल्या तपासणीमध्ये कीटकनाशकांचा अंश आढळला नाही. परंतु यापुढील तपासणीत अशा प्रकारचा अंश आढळल्यास माल परत पाठविण्यात येणार असून, त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

उत्पादनाच्या ३० टक्के हापूस आखाती प्रदेशात, दहा टक्के युरोप, अमेरिकेत ४० टक्के, मुंबई व उर्वरित देशातील अन्य बाजारपेठेत २० टक्के विकला जातो.टॅग्स

संबंधित बातम्या