पालकमंत्री राम शिंदे कृषिकन्यांच्या भेटीला; मात्र, रणरागिणी आंदोलनावर ठाम
09 February 10:20

पालकमंत्री राम शिंदे कृषिकन्यांच्या भेटीला; मात्र, रणरागिणी आंदोलनावर ठाम


पालकमंत्री राम शिंदे कृषिकन्यांच्या भेटीला; मात्र, रणरागिणी आंदोलनावर ठाम

कृषिकिंग, पुणतांबा(अहमदनगर): सरकारने शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पूर्ण न केल्याच्या निषेधार्थ पुणतांबा येथे सुरू असलेल्या कृषिकन्यांच्या अन्नत्याग आंदोलनाच्या पाचव्या दिवशी प्रकृती खालावल्याने शुभांगी जाधव हिला जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले होते. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी काल (शुक्रवारी) सकाळी अर्धा तास रास्ता रोको केला.

तर दुपारी पालकमंत्री राम शिंदे यांनी या कृषिकन्यांची भेट घेऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. परंतु कृषिकन्यांनी स्पष्ट नकार दिल्याने त्यांची शिष्टाई असफल ठरली आहे. निकिता जाधव, शुभांगी जाधव, पूनम जाधव या कृषिकन्यांसह काही महिला ५ दिवसांपासून उपोषणाला बसल्या आहेत.

सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना आतापर्यंत २२ हजार कोटी रूपयांची कर्जमाफी दिली. पेन्शन योजना लागू केली. शेतीमालास बाजारभाव मिळण्याकरिता प्रयत्न चालू आहेत. जिल्ह्यासाठी ६०० कोटींचा निधी दिला. आपल्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असून तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री व महसूलमंत्र्यांची संयुक्त बैठक होणार आहे, असेही शिंदे यांनी यावेळी सांगितले आहे. मात्र, या कृषिकन्यांनी मागण्यांचा विचार होईपर्यंत आंदोलनावर ठाम राहण्याचे ठरवले आहे.संबंधित बातम्या