पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांची थट्टा केली- राहुल गांधी
08 February 18:44

पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांची थट्टा केली- राहुल गांधी


पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांची थट्टा केली- राहुल गांधी

कृषिकिंग, भोपाळ: "वर्षाला सहा हजार रुपये देऊन मोदी सरकारने शेतकऱ्यांची थट्टा केली आहे." असा आरोप करत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला केला. ते आज (शुक्रवार) भोपाळमध्ये आयोजित जाहीर सभेत बोलत होते.

याशिवाय राफेल विमान खरेदी घोटाळ्यात मोदींनी ३० हजार कोटी रुपये पळवले असा आरोप त्यांनी पुन्हा एकदा मोदींवर केला आहे. राहुल गांधी यावेळी म्हणाले आहे की, "मोदी काँग्रेसला संपवायला निघाले आहेत. पण देशातल्या अनेक राज्यांमध्ये काँग्रेसचं सरकार आलं आहे. तर देशातही काँग्रेसचच सरकार येणार आहे. काँग्रेसचं सरकार आलं तर सरकार प्रत्येक गरिबाला आम्ही किमान उत्पन्नाची हमी देऊ. १७ रुपये देऊन थट्टा करणार नाही. " असा टोलाही त्यांनी लगावला आहे.संबंधित बातम्या