उत्तर भारतातील पावसाचा गव्हाला फायदा; तर बटाटा, मोहरीचे मोठे नुकसान
09 February 11:55

उत्तर भारतातील पावसाचा गव्हाला फायदा; तर बटाटा, मोहरीचे मोठे नुकसान


उत्तर भारतातील पावसाचा गव्हाला फायदा; तर बटाटा, मोहरीचे मोठे नुकसान

कृषिकिंग, नवी दिल्ली: उत्तर भारतीय राज्यांमध्ये गेल्या २४ तासांमध्ये गारांसह जोरदार पाऊस झाला आहे. या पावसामुळे उत्तर भारतातील रब्बी हंगामाचे प्रमुख पीक असलेल्या गव्हाला फायदा झाला आहे. मात्र, बटाटा आणि मोहरी या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

मागील २४ तासांत जम्मू-काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी बर्फ पडला आहे. तर हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, दिल्ली व राष्ट्रीय राजधानी क्षेत्रामध्ये गारांसह जोरदार पाऊस झाला आहे. हरियाणातील कुरुक्षेत्र, अम्बाला, यमुनानगर, पंचकूला आणि चंडीगढ़ जोरदार पाऊस झाला आहे. पंजाबमधील लुधियाना येथे गारांसह मुसळधार पाऊस झाला आहे. याशिवाय पंजाबमधील गुरूदासपुर, कपूरथला, अमृतसर आणि जालंधर मध्येही गारांसह पावसाने हजेरी लावल्याचे वृत्त आहे.संबंधित बातम्या