कापूस उत्पादनात पूर्वीच्या अंदाजापेक्षा ५ लाख गाठींनी घट होण्याची शक्यता
10 February 14:50

कापूस उत्पादनात पूर्वीच्या अंदाजापेक्षा ५ लाख गाठींनी घट होण्याची शक्यता


कापूस उत्पादनात पूर्वीच्या अंदाजापेक्षा ५ लाख गाठींनी घट होण्याची शक्यता

कृषिकिंग, पुणे: देशातील यावर्षीच्या कापूस उत्पादनात याआधी व्यक्त केलेल्या अंदाजापेक्षा ५ लाख गाठींनी घट होऊ शकते. असा अंदाज कापूस उद्योगाकडून व्यक्त करण्यात आला आहे. तर २०१८-१९ च्या हंगामात ३३० लाख गाठी (१ गाठ-१७० किलो) इतके कापूस उत्पादन होण्याची शक्यता आहे. असेही उद्योगातील जाणकारांकडून सांगण्यात येत आहे.

यापूर्वी जानेवारी महिन्यात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अंदाजानुसार कापूस उत्पादनात ५.२५ लाख गाठींनी घट होणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यात आता पुन्हा ५ लाख गाठींनी घट होऊ शकते. असे कापूस उद्योगाकडून सांगण्यात आले आहे. मांगील वर्षी ३६५ लाख गाठीचे कापूस उत्पादन झाले होते.

भारतीय कापूस महामंडळाचे (सीआयए) अध्यक्ष अतुल गणात्रा यांनी सांगितले आहे की, तेलंगणा, कर्नाटक आणि आंध्रप्रदेशात कापसाच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. याशिवाय प्रमुख कापूस उत्पादक राज्य असलेल्या गुजरात, महाराष्ट्र मध्येही दुष्काळी स्थितीमुळे मोठी घट झाली आहे.

सीआयएच्या अंदाजानुसार, "२०१८-१९ च्या हंगामात गुजरातमध्ये ८३.५० लाख गाठी इतके कापूस उत्पादन होण्याची शक्यता आहे. जे मागील वर्षीच्या हंगामात १०१.८० लाख गाठी इतके नोंदवले गेले होते. महाराष्ट्रात ७७ लाख गाठी, मध्यप्रदेशात २४.२५ गाठी कापूस उत्पादन होण्याची शक्यता आहे. तर तेलंगणामध्ये ४५ लाख गाठी, आंध्रप्रदेशात १६ लाख गाठी, कर्नाटकात १५ लाख गाठी आणि तामिळनाडू मध्ये ५ लाख गाठी इतके कापूस उत्पादन होण्याची शक्यता आहे."

याशिवाय पंजाब, हरियाणा आणि राजस्थान या उत्तर भारतीय राज्यांमध्ये संयुक्तरित्या ६० लाख गाठी कापूस उत्पादन होऊ शकते. तर ओडिसा आणि अन्य राज्यांमध्ये ४.२५ लाख गाठी कापूस उत्पादन होण्याची शक्यता आहे. असे सीआयएने म्हटले आहे.टॅग्स

संबंधित बातम्या