४ लाख टन मका आयातीला केंद्र सरकारकडून मंजुरीची शक्यता
09 February 08:30

४ लाख टन मका आयातीला केंद्र सरकारकडून मंजुरीची शक्यता


४ लाख टन मका आयातीला केंद्र सरकारकडून मंजुरीची शक्यता

कृषिकिंग, नवी दिल्ली: "देशातंर्गत बाजारात मकाच्या दरात झालेली वाढ आटोक्यात ठेवण्यासाठी केंद्र सरकारकडून लवकरच ४ लाख टन मका आयातीला मंजुरी दिली जाऊ शकते. पोल्ट्री खाद्य उत्पादकांकडून करण्यात आलेल्या मागणीवर केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने याबाबत प्रस्ताव तयार केला आहे." अशी माहिती वाणिज्य मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.

दरम्यान, देशांतर्गत बाजारात महिनाभरात मकाच्या दरात १८ ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. दिल्लीतील मका व्यापारी राजेश गुप्ता यांनी सांगितले आहे की, "दिल्लीत सध्या मकाला २ हजार २५० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळत आहे. महिन्याभरात मकाच्या दरात ४०० ते ४५० रुपयांनी वाढ झाली आहे. याशिवाय मध्यप्रदेशातील बाजार समित्यांमध्ये मकाला सध्या २ हजार ते २ हजार ०५० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळत आहे."टॅग्स

संबंधित बातम्या