२८ फेब्रुवारीपासून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार; पीएम किसान पोर्टल लाँच
08 February 17:05

२८ फेब्रुवारीपासून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार; पीएम किसान पोर्टल लाँच


२८ फेब्रुवारीपासून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार; पीएम किसान पोर्टल लाँच

कृषिकिंग, नवी दिल्ली: केंद्र सरकारने केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना शेतकऱ्यांना वार्षिक ६ हजार रुपये मदत निधी देण्याची घोषणा केली आहे. यासाठी केंद्र सरकारने आता एक (http://pmkisan.nic.in) पोर्टल लाँच केले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून शेतकरी या योजनेच्या संबंधी सर्व माहिती मिळवू शकणार आहे.

या योजनेनुसार, शेतकऱ्यांना २ हजार रुपयांची मदत तीन टप्प्यात दिली जाणार आहे. पहिल्या टप्प्यातील मदत निधी हा मार्च महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा केला जाणार आहे. यासाठी सर्व राज्य सरकारांना आपापल्या राज्यातील पात्र शेतकऱ्यांची यादी अपलोड करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी केंद्र सरकारांकडून राज्य सरकारांना २५ फेब्रवारी पर्यंतचा अवधी देण्यात आला आहे. २५ फेब्रुवारीपर्यंत राज्य सरकारांनी आपापल्या याद्या अपलोड केल्यानंतर, देशभरातील शेतकरी या पोर्टल जाऊन आपल्याला या योजनेचा मिळणार कि नाही? यासाठी ते आपलं नाव चेक करू शकणार आहे.

केंद्र सरकारच्या या योजनेच्या संदर्भांत एका अधिकाऱ्याने सांगितले आहे की, २८ फेब्रुवारीपासून शेतकऱ्यांच्या खात्यात पहिला हप्त्याचे पैसे जमा केले जाणार आहे. ३१ मार्चपर्यंत सर्व शेतकऱ्यांना हा पहिला हप्ता दिला वितरित केला जाणार आहे. याशिवाय लोकसभा निवडणूक असल्याने आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही. याचीही काळजी घेतली जाणार आहे.संबंधित बातम्या