दुष्काळी परिस्थिती; पुणे विभागात रोजगार हमीसाठी केवळ ६७ हजार मजूर
08 February 12:50

दुष्काळी परिस्थिती; पुणे विभागात रोजगार हमीसाठी केवळ ६७ हजार मजूर


दुष्काळी परिस्थिती; पुणे विभागात रोजगार हमीसाठी केवळ ६७ हजार मजूर

कृषिकिंग, पुणे: राज्यात दुष्काळी परिस्थिती असली तरी अजूनही रोजगार हमी योजनेच्या कामावर जाणा-या मजूरांच्या संख्येत फारशी वाढ झालेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे विभागात जानेवारी अखेरपर्यंत ६७ हजार ३६६ मजूर रोजगावर हमीच्या कामावर जात आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील सर्वात कमी ३ हजार २५७ तर सांगली जिल्ह्यातील सर्वाधिक २० हजार ६७५ मजूरांचा समावेश आहे.

विभागात सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता अधिक असल्याने या जिल्ह्यात रोजगार हमीवर जाणा-या मजूरांची संख्या अधिक आहे. सध्यस्थितीत सांगली जिल्ह्यातील सर्वाधिक २० हजार ६७५, त्यानंतर सातारा जिल्हयात १९ हजार ५०६, सोलापूर जिल्ह्यात १३ हजार ७१२, कोल्हापूर जिल्ह्यात १० हजार २०७ तर पुणे जिल्ह्यात ३ हजार २५७ मजूर रोजगार हमीच्या कामावर जात आहेत.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून पेयजल स्त्रोतांसह भूजल पुनर्भरण करण्याबरोबरच सुक्ष्म व लघु पाटबंधा-याची कामे, सिंचन कालवे, नाली बांधणे, वन जमिनींवर सडक पट्टा, कालवा बांध, तलाव अग्रतट आणि किनारी पट्टे यावर वनरोपण, वृक्षारोपण, वृक्षलागवड आदी कामे केली जातात. त्याचप्रमाणे ग्रामपंचायत स्तरावर केली जाणारी जलसंधारणाची व विविध विकासाची कामे रोजगार हमीच्या माध्यमातून सुरू आहेत.टॅग्स

संबंधित बातम्या