मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता
08 February 12:05

मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता


मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता

कृषिकिंग, पुणे: मराठवाडा व विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली़ आहे. तर मध्य महाराष्ट्राच्या काही भागात पुन्हा तापमानात घट झाली असून सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाल्याचे पाहायला मिळत आहे़. ८ ते १० फेब्रुवारी दरम्यान गोव्यासह संपूर्ण महाराष्ट्रात हवामान कोरडे राहू शकते. त्यामुळे ११ फेब्रुवारीला मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे़.

कोकण, गोवा व विदर्भात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे़. राज्यात सर्वात कमी किमान तापमान अहमदनगर येथे ९़.९ अंश सेल्सिअस नोंदविले गेले़. पुढील आठवड्यात विदर्भात किमान तापमान हे सरासरीच्या तुलनेत घटलेले राहणार आहे़. उत्तर भारतात अनेक ठिकाणी गारपीटीची शक्यता आहे़. दरम्यान, राजधानी दिल्लीच्या अनेक भागांमध्ये काल गारांसह हलक्या पावसाची नोंद झाली आहे.टॅग्स

संबंधित बातम्या