शेतकऱ्यांसाठी योजनांचा पाऊस; मात्र, आत्महत्यांचा आकडा काही कमी होईना
11 February 08:30

शेतकऱ्यांसाठी योजनांचा पाऊस; मात्र, आत्महत्यांचा आकडा काही कमी होईना


शेतकऱ्यांसाठी योजनांचा पाऊस; मात्र, आत्महत्यांचा आकडा काही कमी होईना

कृषिकिंग, अमरावती/औरंगाबाद: कर्जमाफी आणि शेतकऱ्यांना विविध योजनांच्या आधारे मदत केली जात असली तरी आत्महत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. १ जानेवारी २०१३ ते ३१ डिसेंबर २०१८ या सहा वर्षांच्या कालावधीत अमरावती विभागातील ५ हजार ९४२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. तर यातील केवळ ३ हजार २०७ शेतकऱ्यांना सरकारने मदतीचा हात दिला आहे. तर २ हजार ५३२ शेतकऱ्यांना मदतीस अपात्र ठरवण्यात आले आहे. अशी माहिती अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाने माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांना दिली आहे.

यातील विशेष बाब म्हणजे गेल्या सहा वर्षात एकट्या यवतमाळ जिह्यातील १ हजार ६५७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. या आकडा विभागातील अन्य जिल्ह्यांपेक्षा मोठा आहे. त्यानंतर अमरावती जिल्ह्यात १ हजार ५४१, बुलढाण्यात १ हजार २७९, अकोल्यात ९५३ तर वाशिममध्ये ५१२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबाद विभागात जानेवारी २०१९ या महिन्यात ६७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
कर्जमाफी आणि अन्य योजनांमध्ये टाकण्यात आलेल्या अटी आणि ग्रीन लिस्ट येण्यास लागलेला विलंब यामुळे आत्महत्यांचे सत्र काही थांबले नाही. हेच यातून समोर येत आहे.टॅग्स

संबंधित बातम्या