राजधानी दिल्लीत गारांसह हलक्या पावसाची हजेरी
07 February 18:47

राजधानी दिल्लीत गारांसह हलक्या पावसाची हजेरी


राजधानी दिल्लीत गारांसह हलक्या पावसाची हजेरी

कृषिकिंग, नवी दिल्ली: राजधानी दिल्लीसह आसपासच्या परिसरात (एनसीआर) परिसरात आज (गुरुवारी) गारांसह हलका पाऊस झाला आहे. ढगांच्या कडकडाटासह अनेक भागात पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. तर अनेक ठिकाणी गारा पडल्याचे वृत्त आहे. हवामानात बदल झाल्याने राजधानी परिसरात हवेतील गारवा वाढला आहे.

७ फेब्रुवारीला दिल्लीच्या अनेक भागात पाऊस पडू शकतो. असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले होते. हवामान विभागाच्या या अंदाजानुसार आज सकाळपासूनच दिल्लीच्या वातावरणात बदल झाल्याचे पाहायला मिळाले. राजधानी दिल्लीच्या अनेक भागांमध्ये सकाळपासून गारांसह हलका पाऊस सुरु आहे.
टॅग्स

संबंधित बातम्या