पुणतांब्यातील कृषीकन्यांचं अन्नत्याग आंदोलन; एकीची प्रकृती खालावली
07 February 18:30

पुणतांब्यातील कृषीकन्यांचं अन्नत्याग आंदोलन; एकीची प्रकृती खालावली


पुणतांब्यातील कृषीकन्यांचं अन्नत्याग आंदोलन; एकीची प्रकृती खालावली

कृषिकिंग, पुणतांबा(अहमदनगर): सरकारने शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पूर्ण न केल्याच्या निषेधार्थ पुणतांबा येथील कृषीकन्या उपोषणाला बसल्या आहेत. या उपोषणाचा आजचा चौथा दिवस असून कुठल्याही नेत्याने याची दखल घेतलेली नाही. चार दिवसांपासून तीन कृषीकन्या अन्नत्याग आंदोलन करत आहेत. त्यापैकी शुभांगी जाधव या मुलीची तब्येत खालावली आहे.

किसान क्रांती समन्वय समितीच्या ‘देता की जाता’ आंदोलनाला पाठिंबा देत पुणतांबा येथील कृषीकन्या अन्नत्याग आंदोलन करत आहेत. निकिता जाधव, शुभांगी जाधव आणि पूनम जाधव या तीन जणी गेल्या चार दिवसांपासून शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी उपोषणावर बसल्या आहेत. सातबारा कोरा करा, शेत मालाला दीड पट हमीभाव द्या, दुधाला प्रतिलिटर ५० रुपये भाव द्या अशा प्रमुख मागण्यांसह या मुली चार दिवसांपासून आंदोलन करत आहेत. अन्नत्याग केल्याने तिन्ही मुलींचं वजन कमी झालं आहे. तर आता शुभांगी जाधव हिची प्रकृतीही खालावली आहे.

वैद्यकीय पथकाने आंदोलनकर्त्यांची तपासणी केल्यानंतर याचा अहवाल तहसीलदारांना पाठवण्यात आला. त्यानंतर तहसीलदार माणिक आहेर यांनी उपोषणस्थळी भेट दिली. शुभांगीला रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात आला. मात्र, शुभांगीने नकार दिला. जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरु ठेवण्याचा निर्धार या मुलींनी केला आहे.संबंधित बातम्या