साखर कारखाने आणि राजू शेट्टी यांच्यात साटंलोटं- रघुनाथदादा पाटील
07 February 12:36

साखर कारखाने आणि राजू शेट्टी यांच्यात साटंलोटं- रघुनाथदादा पाटील


साखर कारखाने आणि राजू शेट्टी यांच्यात साटंलोटं- रघुनाथदादा पाटील

कृषिकिंग, पुणे: शेतकऱ्यांना रास्त व किफायतशीर दर (एफआरपी) एकरकमी देणे, साखर कारखान्यांना बंधनकारक आहे. तो त्यांचा हक्कच आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने त्यासाठी आंदोलन करण्याची गरज नव्हती. साखर कारखाने आणि राजू शेट्टी यांच्यात साटंलोटं असल्याची टीका शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केली आहे.

रघुनाथदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली साखर आयुक्तालयाच्या प्रवेशद्वारावर ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी २५ जानेवारीपासून धरणे आंदोलन सुरु आहे. केंद्र आणि राज्य सरकारची भूमिका शेतकरी विरोधी आहे. त्यामुळे या सरकारला शेतकरी धडा शिकल्याशिवाय राहणार नाही. यापूर्वीचे सरकार साखर कारखानदारांचे होते, तर आताचे सरकार हे कारखानदारांनी विकत घेतल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.संबंधित बातम्या