हिमनद्या वितळणार; हवामान बदलामुळे भारतात दुष्काळाची स्थिती निर्माण होईल- रिपोर्ट
07 February 11:55

हिमनद्या वितळणार; हवामान बदलामुळे भारतात दुष्काळाची स्थिती निर्माण होईल- रिपोर्ट

हिमनद्या वितळणार; हवामान बदलामुळे भारतात दुष्काळाची स्थिती निर्माण होईल- रिपोर्ट

कृषिकिंग, पुणे: हिमालयाच्या पर्वरांगा म्हणजे निसर्गाची एक अभूतपूर्व देणगीच आहे. पण, येत्या काही वर्षांमध्ये याच हिमालयाचं अस्तित्व धोक्यात येणार आहे. जागतिक हवामानात होणारे बदल पाहता येत्या काळात हिमनद्या वितळून पुरसदृश्य परिस्थितीचं संकटही ओढवणार असल्याची चिंता एका अहवालातून व्यक्त करण्यात आली आहे.

हिमालयाला हानी पोहोचल्यास त्याच्या सभोवताली असणाऱ्या एकूण सात देशांनाही याचा धोका आहे. त्यासोबतच हवामान बदलामुळे भारतात दुष्काळाची स्थिती निर्माण होईल असेही या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. याशिवाय येत्या काळात हवामानात लक्षणीय बदल होणार असून, थंडी, उष्णता यांच्यासह पिकांवरही या साऱ्याचा थेट परिणाम होणार आहे.संबंधित बातम्या