इथेनॉल प्लांट उभारणीसाठी स्वस्त दरात कर्ज मिळणार
07 February 08:30

इथेनॉल प्लांट उभारणीसाठी स्वस्त दरात कर्ज मिळणार


इथेनॉल प्लांट उभारणीसाठी स्वस्त दरात कर्ज मिळणार

कृषिकिंग, नवी दिल्ली: आता फक्त साखर कारख्यान्यांनाच नाही तर साखर कारखाना नसलेल्या कंपन्यांनाही इथेनॉल प्लांट उभारणीसाठी स्वस्त दरात कर्ज मिळणार आहे.

साखर कारखाने आणि गैर-साखर कारखानदार कंपन्यांसाठी जवळपास १२ हजार कोटींच्या कर्ज प्रस्तावाला या आठवड्यात केंद्रीय कॅबिनेट मंत्रिमंडळाची मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. या संदर्भातील प्रस्ताव कॅबिनेटकडे पाठवण्यात आला आहे. त्यावर लवकरच सकारात्मक निर्णय येण्याची शक्यता आहे.

त्यामुळे आता साखर कारखानदारांव्यतिरिक्त अन्य कंपन्यांनाही इथेनॉल निर्मितीसाठी स्वस्त दरात कर्ज मिळणार आहे. यामुळे इथेनॉल निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना व्याजात ५ वर्षांपर्यंत जवळपास ५ टक्क्यांची सूट मिळणार आहे. यासाठी १२ हजार कोटींच्या पॅकेजचा प्रस्ताव कॅबिनेट समोर ठेवण्यात आला आहे.टॅग्स

संबंधित बातम्या