ऑस्ट्रेलियात १०० वर्षातील सर्वात मोठा महापूर; शेकडो लोकांनी घर सोडलं
06 February 11:12

ऑस्ट्रेलियात १०० वर्षातील सर्वात मोठा महापूर; शेकडो लोकांनी घर सोडलं


ऑस्ट्रेलियात १०० वर्षातील सर्वात मोठा महापूर; शेकडो लोकांनी घर सोडलं

कृषिकिंग, वृत्तसेवा: दुष्काळानंतर ईशान्य ऑस्ट्रेलियात आलेल्या पुरामुळे लोकांचे संकट वाढले आहे. पुरामुळे हजारो लोकांना घर सोडणे भाग पडत आहे. येत्या काही दिवसांत ऑस्ट्रेलियात अधिक पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, या शतकातील हा सर्वांत मोठा पूर असल्याचे सांगण्यात येत आहे. ऑस्ट्रेलियातील या भागात मान्सूनमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. मात्र, नुकताच झालेला पाऊस हा सरासरीपेक्षा जास्त आहे.

ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलँड राज्याच्या वरती धिम्या गतीने पुढे जाणारे मान्सून क्षेत्र कमी दाबाचे क्षेत्र बनले आहे. यामुळे काही भागांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने येत्या ७२ तासांत हवामान बदलण्याची शक्यता व्यक्त केली आहे.टॅग्स

संबंधित बातम्या