१ फेब्रुवारीनंतर जमिनीची वाटणी करणाऱ्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ नाही
05 February 17:40

१ फेब्रुवारीनंतर जमिनीची वाटणी करणाऱ्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ नाही


१ फेब्रुवारीनंतर जमिनीची वाटणी करणाऱ्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ नाही

कृषिकिंग, पुणे: केंद्र सरकारने अर्थसंकल्प सादर करताना २ हेक्टरपेक्षा कमी शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ६ हजार रुपये मदतीची घोषणा केली आहे. या पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेसाठी (पीएम-किसान) सरकारकडून काही अटी निर्धारित करण्यात आल्या आहेत.

याअंतर्गत १ फेब्रुवारीनंतर जमिनीची वाटणी करण्यात आलेल्या, २ हेक्टरपेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. सरकारने जारी केलेल्या आदेशानुसार असे पुढील ५ वर्षांपर्यंत सुरु असणार आहे. अर्थात २०२४ पर्यंत योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये कोणताही फेरबदल करण्यात येणार नाही. दरम्यान, या योजनेच्या जारी करण्यात आलेल्या नियम व अटींसाठी केंद्र सरकारने राज्यांकडून सूचना मागवल्या आहेत.

३० जानेवारी २०२४ नंतर योजनेच्या नियमांमध्ये बदल शक्य:
एखाद्या शेतकऱ्याने आपल्याकडील ६ हेक्टर जमीन १ फेब्रुवारी २०१९ नंतर आपल्या ४ मुलांमध्ये वाटली. तर त्या शेतकऱ्याच्या मुलांना प्रत्येकी १.५ हेक्टर जमीन मिळणार आहे. यामुळे या शेतकऱ्याचे ४ ही मुले योजनेचे लाभार्थी होऊ शकतात. मात्र, या शेतकऱ्याच्या मुलांना या योजनेचा लाभ हा ३० जानेवारी २०२४ नंतरच मिळणार आहे. तर एखाद्या शेतकऱ्याने आपली जमीन अन्य व्यक्तीला विकली. तर त्या व्यक्तीला २ हेक्टरच्या आत जमीन असल्यास तात्काळ योजनेचा लाभ मिळणार आहे.

काय आहेत योजनेच्या अटी:
१. या योजनेचा लाभ घेणारा शेतकऱ्याचे नावे १ फेब्रुवारी २०१९ पूर्वी २ हेक्टरपेक्षा कमी जमीन असावी.
२. २ हेक्टरपेक्षा कमी जमीन आहे. या जमिनीवर कोणतेही पीक येत नाही. अशा शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे.
३. नव्याने शेती खरेदी केल्यानंतर ती २ हेक्टरपेक्षा जास्त असली तरीही त्या शेतकऱ्याला या योजनेचा लाभ मिळणार आहे.संबंधित बातम्या